top of page
WhatsApp Image 2025-05-05 at 1.23.58 PM.jpeg
WhatsApp Image 2026-04-09 at 1.19.30 PM.jpeg

 20th April Panjim - संगीत कट्यार काळजात घुसली

स्त्रीशक्तीचा स्वरमय आविष्कार : ‘कट्यार काळजात घुसली’ गोव्यातील नाट्य प्रेमिकांच्या पसंतीस उतरलेले नाटक पुन्हा रंगभूमीवर.

परंपरेने पुरुषप्रधान मानल्या गेलेल्या या संगीत नाटकातील सर्व भूमिका—खानसाहेब, पंडितजी, तसेच इतर प्रमुख व्यक्तिरेखा—महिलांनी समर्थपणे साकारत, अभिनय आणि गायनाचा एक अनोखा ठसा उमटवला आहे.
या प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ भूमिकांचे स्त्रीसादरीकरण नव्हे, तर त्यामागील तपश्चर्या, रियाज आणि कलाविष्काराची प्रामाणिकता. प्रत्येक कलाकाराने शास्त्रीय संगीताच्या बारकाव्यांपासून ते भावनांच्या सूक्ष्म छटांपर्यंत सर्व पैलूंवर मेहनत घेत, प्रेक्षकांसमोर एक परिपूर्ण कलानुभव उभा केला आहे.

महाराष्ट्र दौरा आटोपून लगेच दि. २० एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ७:०० वा कला अकादमी - पणजी आणि दि. २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री ७:०० वा गोमंतक विद्यानिकेतन - मडगाव दोन चुकवू नये  असे प्रयोग प्रेक्षकांच्या आग्रहास्तव करण्यात येणार आहेत.

या उपक्रमातून स्त्रीशक्तीचा आत्मविश्वास, कला आणि परंपरेप्रती असलेली निष्ठा यांचा संगम दिसून येतो. ‘कट्यार काळजात घुसली’च्या या नव्या सादरीकरणाने नक्कीच रंगभूमीवर एक वेगळा इतिहास घडवण्याची क्षमता निर्माण केली आहे.

22nd April Margao - संगीत कट्यार काळजात घुसली

bottom of page